डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

हिमायतनगर / विष्णु जाधव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले शैक्षणिक मुल्य समाजात रूजवण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मे. फकीरा बहुउद्देशीय संस्था बळीरामपुर नांदेड यांच्या वतीने तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मौजे एकघरी येथील शाळेती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक खैरे सर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन चिलकर सर, राठोड सर , कुमारवाड सर, वाळके सर, डवरे सर, घोडके सर, निम्मलवाड सर आदीची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून त्रिशरण – पंचशिलाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष खैरे सर यांनी डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांची पुढील स्वप्न जाणुन घेतली व त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मोठं व्हावे. अश्या शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. शिक्षण हे समाजातील लाभवंचित आणि शोषीत घटकांना त्यांचे हक्क आणि अधिकार, कर्तव्यांची जाणीव करून देत असते. समाजात सुधारणा घडवुन आणता येते. असा बहुमोल संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी ,शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निळ्या आकाशातील लाल वादळ या संचाचे ख्यातनाम प्रबोधनकार माधवराव वाघमारे कृष्णुरकर, स्वर गायिका सविता गोदाम, तबलावादक आदिराज वाघमारे ,पेटीवाद सुरज गायकवाड यांनी प्रबोधनात्मक गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तावित संस्थेचे अध्यक्ष संतोष तेलंग यांनी केले. तर सूत्रसंचालन रंजीत रोकडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रविण मल्लेवार, साईप्रसाद जळपतराव, सचिन वाघमारे, संदिप फुलारे आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले होते.



