Uncategorized

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या विविध जबाबदाऱ्या जाहीर !

कोअर कमिटीसह राज्यस्तरीय पदभार घोषित

 

 

पुणे / एस. एन. नांदेडकर

 

‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’च्या पुढील वाटचालीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देण्यासाठी संघटनेतील विविध सहकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांची क्रियाशीलता, कौशल्य, अनुभव आणि जबाबदारीची जाणीव विचारात घेऊन मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या.

 

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये रायगड येथून अंकुश सोनवणे, पुण्यातून ॲड. नितीन घोडके व ॲड. प्रियंका गायकवाड, चंद्रपूरहून रिता रामटेके, सोलापूरहून स्वाती चव्हाण, ठाण्यातून विराज निकम व पप्पू रोडे, नाशिकमधून मछिंद्र ढेंगळे, पालघरमधून सुकलाल पाटील, बुलढाण्यातून शुभांगी गुरचळ आणि मुंबईतून विशाल वाघमारे यांचा समावेश आहे.

 

यासोबतच राज्यस्तरीय पातळीवर डॉ. अविनाश मनवर यांची राज्य सांस्कृतिक विभाग प्रमुख, सुनंदा साबळे यांची राज्यस्तरीय स्पर्धा व उपक्रम नियोजन प्रमुख, वैशाली देठे यांची राज्य साहित्यिक व कलावंत समन्वयक प्रमुख, तर संघशिल भद्रे यांची राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

यावेळी मुख्य समन्वयक संदेश कर्डक यांनी सांगितले की, “ही जबाबदारी केवळ पद नसून चळवळ पुढे नेण्याचे कर्तव्य आहे. सर्व सहकारी संविधानिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून पारदर्शकतेने कार्य करतील.”

 

दरम्यान, जाहीर करण्यात आलेली ही अंतिम यादी नसून आगामी काळात प्रत्येक सदस्याचे संघटन कौशल्य, लेखन, तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य आणि जनसंपर्कातील योगदान विचारात घेऊन आणखी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार असल्याचेही कर्डक यांनी स्पष्ट केले.

 

आंबेडकरी विचार, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक चळवळीचा व्यापक प्रसार करण्यासाठी नव्या जबाबदाऱ्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘व्यक्तीपेक्षा चळवळ आणि पदापेक्षा जबाबदारी मोठी’ हा संदेश देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button