Uncategorized

बिबट्याच्या मुक्त संचारमुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 

वन विभागाने रात्रीची गस्त वाढवावी अशी शेतकऱ्यांची मागणी

 

 

विष्णु जाधव / हिमायतनगर

 

हिमायतनगर तालुक्यासह जिल्हाभरात दररोज कुठे ना कुठे बिबट्या आढळत असल्याची बातमी ऐकायला येत आहे तशीच बातमी दि. ११ डिसेंबरच्या रात्री हिमायतनगर शहरातील बोरगडी रोड येथे पोलीस स्टेशनच्या पाठीमागील भागात एक बिबट्या मुक्त संचार करत असल्याचा एक धक्कादायक वार्ता तालुक्यात पसरली. सकाळी फिरायला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकासह रात्रपाळी मध्ये पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्या तसेच अन्य हिस्त्र वन्य प्राण्याचे दर्शन होत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. बोरगडी वारंगटाकळीसह आदी भागांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याची माहिती आढळून आल्याची चर्चा जोरदार चालू आहे. बिबट्याची दहशत तालुक्यात पसरल्याने संबंधित शेतकरी हे रात्रपाळीचे शेताला पाणी देण्यासाठी जाताना भीती निर्माण झाल्यामुळे शेतीचे कामे ठप्प झाली आहेत. रात्रीच्या गस्तीबद्दल वनविभाग अजूनही कुठलेही पावले उचलताना दिसून येत नाहीत. तर काही ठिकाणी दिवसा शेतावर जाणे सुद्धा शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आहेत. त्यात भर म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवसा लोड शिडिंग तर रात्रीला वीजपुरवठा सुरू असल्याने शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतावर जावे लागत आहे. बिबट्यासह वन्य हिंस्त्र प्राण्याच्या हालचाली वाढलेल्या काळात हा प्रवास जीवावर बेतण्यासारखा आहे म्हणून जीवावर उदार होऊन काही शेतकऱ्यांना रात्रपाळीचे पाणी देण्यासाठी करावी लागणारी कसरत मोठी जोखमेची आहे. त्यामुळे या सर्व गंभीर घटनेवर हिमायतनगर तालुका वनविभागाने तातडीने पावले उचलून शहरासह ग्रामीण भागात मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्या व वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील सुजान नागरीकांसह शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button