Uncategorized

पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम भोशी येथील शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाईची मागणी

सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांचे निवेदन

 

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड

पोस्ट बेसिक आदीवासी आश्रम शाळा भोशी व कै. कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, भोकर, जि. नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभाग, किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोनबा वानोळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर शासनाकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांचा योग्य वापर होत नसल्याची माहिती समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, निवास, आहार व इतर योजनांमध्ये अनियमितता असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी स्वतः शाळेला भेट देऊन संपूर्ण चौकशी करावी तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वानोळे यांनी केली आहे.

दरम्यान, या तक्रारीमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित विभागाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाणार का, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button