Uncategorized

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नवोदय व सैनिकी अकॅडमीचे पाच विद्यार्थी पात्र

 

नांदेड / दाऊ गाडगेवाड

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून हदगाव तालुक्यातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नवोदय व सैनिक अकॅडमीने पहिल्याच वर्षात घवघवीत यश संपादन केले आहे. या अकॅडमीतील सार्थक सिद्धोधन कवडे, प्रणव गौतम थोरात, महिमा संतोष श्रावणे, प्रांजली शिवाजी धावंडकर आणि विराट दयानंद नरवाडे हे विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. तसेच यापूर्वी नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत तीन विद्यार्थी आणि सैनिक पात्रता परीक्षेत ११ पैकी ११ विद्यार्थी पास झाले आहेत. या यशामागे अकॅडमीतील शिक्षक अर्जुन नरवाडे, अजय चव्हाण, निलेश जाधव, गजानन जाधव, आरती भाकरे-माने व संचालक शंकर माने यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button