Uncategorized

माधव काईतवाड यांची DANV नांदेड युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

सामाजिक बांधिलकी, युवकांचे संघटन आणि समाजहिताच्या कार्याला प्राधान्य देणारे  माधव बालाजी काईतवाड यांची डि.ए.एन.व्ही. (DANV) नांदेड युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

माधव काईतवाड हे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी, ता. हिमायतनगर येथील रहिवासी असून, युवकांना संघटित करून सामाजिक उपक्रमांना चालना देणे, नवीन सदस्य व कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे तसेच संघटनेच्या कार्याची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

“एक नाव, एक ओळख, एक परिवार” या विचारधारेतून संघटनेची एकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याची जबाबदारी माधव काईतवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात युवकांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणे, रोजगार व व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणे, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सहकार्य करणे तसेच समाजात सकारात्मक नेतृत्व निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

या नियुक्तीबद्दल DANV महाराष्ट्र मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष महादेव शरण्णा उप्पे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माधव काईतवाड यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“मिळालेली जबाबदारी ही केवळ पद नसून युवक आणि समाजासाठी काम करण्याची संधी आहे,” या भावनेतून काईतवाड आगामी काळात संघटनात्मक कार्याला अधिक गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button