पीक कापणी प्रयोग विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न
रुई येथे शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग पार पडला

नांदेड / दाऊ गाडगेवाड
हदगाव तालुक्यातील रूई येथे शासकीय नियमानुसार पीक कापणी प्रयोग विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शासकीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, कृषी सहायक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पीक कापणी प्रयोगास उपविभागीय अधिकारी अविनाश काबळे , तालुका कृषी अधिकारी पाटील, नायब तहसीलदार काकडे , तलाठी मॅडम हंबर्डे, कृषी सहायक गजानन संगेवार तसेच संबंधित पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शेतातील प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी करून नियमानुसार पीक कापणी प्रयोग करण्यात आला. प्रयोगादरम्यान उत्पादनाची नोंद, पिकाची प्रत्यक्ष स्थिती व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक बाबींची पाहणी करण्यात आली.
पीक कापणी प्रयोगामुळे पिकांच्या प्रत्यक्ष उत्पादनाची वस्तुनिष्ठ नोंद होऊन पीक विमा नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या प्रक्रियेस मदत होणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
या वेळी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा, नुकसानभरपाई व शेतीशी संबंधित विविध बाबींवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती घेत आवश्यक मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक पद्धतीने पीक कापणी प्रयोग झाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जावळे मा.सरपंच अमोल कदम, बाबुसराव कदम, किशोर पाटिल, वसंतराव कदम, महेश पाटील, जयराम पाटील, भारत कदम, प्रल्हाद पडघणे, नारायन कदम, साहेबराव लामतुरे, कैलासराव कदम, गजानन कदम, खडु लामतुरे व गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते. अनुसयाबाई शेकुराव कदम व सुभाष लामतुरे यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षपणे पीक कापनी प्रयोग करण्यात आला.



