Uncategorized

का. उत्तमराव पंडित यांच्या स्मरणार्थ हिमायतनगर (नांदेड) मध्ये राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार सोहळा; कादंबरीकारांना सहभागाचे आवाहन.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुरस्कार वितरण सोहळा.

 

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संवेदना फाउंडेशनतर्फे या वर्षीचा राज्यस्तरीय संवेदना साहित्य गौरव पुरस्कारा’ चे सलग दुसरे वर्ष घोषित करण्यात आले आहे. दैनिक लोक शक्ती चे विभागीय संपादक श्री रमेश पंडित यांच्या वडिलांच्या—कै. उत्तमराव दत्तराव पंडित यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून या पुरस्काराचे आयोजन केले जाते.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून ‘कादंबरी’ या साहित्यप्रकारातील पुस्तके मागवण्यात येत आहेत.

साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. निवड झालेल्या विजेत्या साहित्यिकाला राज्यस्तरीय संवेदना साहित्य गौरव पुरस्कार २०२६, सन्मानपत्र, वैशिष्ट्यपूर्ण स्मृतीचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. हा पुरस्कार वितरण सोहळा लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदारांच्या विशेष उपस्थितीत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वा. हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे पार पडणार आहे.

कादंबरी पाठवण्यासाठी महत्त्वाच्या अटी व माहिती:

साहित्य प्रकार: फक्त कादंबरी (प्रकाशित).

आवश्यक प्रती: प्रत्येक साहित्यिकाने आपल्या कादंबरीच्या २ प्रती पाठवणे बंधनकारक आहे महाराष्ट्रातील सर्व नवोदित व ज्येष्ठ लेखकांसाठी आणि

महाराष्ट्रातील सर्व कादंबरीकारांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती लवकरात लवकर पाठवून या साहित्य सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आग्रही आवाहन संवेदना फाउंडेशनच्या सचिव सीमा लिंगायत, रोहित पंडित,कल्पना कांबळे,तथा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.साहित्य १० ऑक्टोबर पर्यंत पाठवावे, साहित्य :पाठवण्याचा पत्ता

श्री.बाबासाहेब मुनेश्वर सर

समता झेरॉक्स सेंटर

परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स दुसरा मजला, हिमायतनगर

ता. हिमायतनगर जिल्हा नां

देड ४३१८०२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button