संजय वडवळे सरांची बदली झाल्याने शेलोडा वासीयांचा भावनिक निरोप

दाऊ गाडगेवाड हिमायतनगर प्रतिनिधी /-
शेलोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय वडवळे सरांची वाळकी बु. ता. लोहा येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाल्याने शेलोडा वासियांनी त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना भावनिकरित्या निरोप दिला.
संजय वडवळे सरांनी शेलोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल सात वर्षे ज्ञानाचे धडे देऊन घडवण्याचं काम केले. त्यांचे अनेक विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झाले आहेत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे विद्यार्थ्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते अशा कृतिशील शिक्षकाची शेलोडा येथून बदली झाली. त्यामुळे ग्रामस्थानी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यक्ष भाऊराव पाटील भोयर, शिक्षण विस्तार अधिकारी आरुण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजु पाटील भोकर, केंद्र प्रमुख धात्रकर, मुख्याध्यापक गजानन कदम, देशमुख मॅडम, गणेश आरबडवाड, प्रकाशराव भोयर, नारायण सुर्यवंशी, प्रभाकर भोयर, मधुकर भोयर, मारोती ऊदगिरवाड, दादाराव पाटील भोयर, सतीष ऊदगिरवाड, दशरथ पवार, बालाजी वानखेडे, मुकींद भोयरसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



