उष्माघाताने मृत्यू झालेल्यांना नैसर्गिक आपत्तीप्रमाणे अनुदान मिळवून द्यावे – प्राजक्ता गुंडेकर

नांदेड / विजय वाठोरे
सद्यस्थितीला महाराष्ट्र मध्ये प्रचंड प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढले असून नांदेड जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये तापमान 45° पेक्षाही जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे उष्माघातामुळे अनेकांचे बळी जात आहेत. उष्माघातामुळे बळी गेलेल्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करून नैसर्गिक आपत्तीप्रमाणे अनुदान मिळून द्यावे यासाठी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राजक्ता रामराव गुंडेकर सरसमकर, शिवसेना (उबाठा ) युवती सेना नांदेड जिल्हा समन्वयक यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला असून महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यांमध्ये ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे उन्हात काम करणारे रोजदार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भर उन्हात काम करत असतात.भर उन्हामध्ये देखील त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नसतो. सध्या उन्हाचा पारा प्रचंड तापला असून उष्माघाताच्या बळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोरगरीब रोजमजूर दार माणसांच्या उष्माघाताचे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे त्यांच्यावरच उष्माघाताचे परिणाम जाणवणार आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ याची दखल घेऊन गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा.यासाठी उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांना नैसर्गिक आपत्ती प्रमाणे अनुदान मिळवून द्यावे. उष्माघाताच्या आपत्तीला नैसर्गिक आपत्तीमध्ये घेऊन न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना शिवसेना (उबाठा) युवती सेना जिल्हा समन्वयक प्राजक्ता रामराव गुंडेकर सरसमकर यांनी केली आहे.



