Uncategorized
हिमायतनगर येथे संत भिमाभोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हिमायतनगर / विष्णु जाधव
संत शिरोमणी भिमा महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर येथे भोई समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत भिमा महाराजांना अभिवादन करून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. समाजाच्या एकात्मतेसाठी, शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

संत भिमाभोई यांच्या जयंती सोहळ्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील भोई समाज बांधवांमध्ये एकता आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले. हा उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी भोई समाज महासंघाचे माधवराव बावणे, विजय उट्टलवाड, साहेबराव आष्टकर, माधव वदतवाड, ऍड. ज्ञानेश्वर पंदलवाड, पत्रकार दाऊ गाडगेवाड यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.



