उपनगराध्यक्ष जावेद यांचा आ.चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
हिमायतनगर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची जोरदार एन्ट्री नगराध्यक्षा सह सर्व जागा लढवणार -मोहम्मद जावेद

विष्णु जाधव / हिमायतनगर
हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार एन्ट्री झाल्याचे दिसून येत आहे हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांच्यासह असंख्य जणांनी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आज दि 13 नोव्हेंबर रोजी जाहीर प्रवेश करून नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सर्व जागा लढवून त्या जिंकण्याचा त्यांनी यावेळी निर्धार केला त्यामुळे हिमायतनगर शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर नगरपंचायतीचे राजकीय समीकरण दिवसेंदिवस बदलत आहेत आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी यांनी त्यांच्या सहकार्यासह आज आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला व आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळावर सर्व च्या सर्व जागा लढणार व त्या जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकी चे वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरपंचायत निवडणुकीमध्ये जोरदार एन्ट्री केल्यामुळे शहरातील उपनगराध्यक्ष जावेद भाई यांना मानणारा मोठा वर्ग शहरात असल्याचे बोलल्या जात आहे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत जावेद यांच्या इंटरने नक्कीच विरोधकांचे समीकरण बिघडणार असल्याचे दिसून येत आहे पण काँग्रेस व शिवसेना भाजपाने अजून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे ऐनवेळी या पक्षाकडून कोण उमेदवार होणार हे सुद्धा सांगता येणार नाही
हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार.काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जाविद यांच्या सह शेकडो जणांनी दादाच्या राष्ट्रवादीत केला पक्ष प्रवेश .
हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर मोहम्मद जाविद यांची नाराजी व्यक्त करून हिमायतनगर नगर पंचायतचा निवडणूक कार्यक्रम घोषित होताच काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित आज नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांसह दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोहम्मद जाविद यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याने हिमायतनगर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत हिमायतनगर नगर पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू अशी प्रतिक्रिया मोहम्मद जाविद यांनी दिली आहे.



