Uncategorized
दिनेश वानखेडे यांची चालू आर्थिक वर्षात पॉलिसेचे शतक

हिमायतनगर / विष्णु जाधव
चालू आर्थिक वर्षात १०१ भारतीय जीवन वीमा (पॉलिसी) पूर्ण करून दिनेश वानखेडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

अथक परिश्रम, सातत्य आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेचे नाव उंचावले असून इतरांसाठीही त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. दिनेश वानखेडे यांना पुढील वाटचालीसाठी तालुक्यासह गावातील नागरीकांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



