Uncategorized

मराठा सेवा संघाच्या हदगांव तालुकाध्यक्षपदी शाहिर गजानन जाधव     

 

 

नांदेड / दाऊ गाडगेवाड

मराठा सेवा संघ या वैचारिक संघटनेच्या हदगांव तालुकाध्यक्षपदी शाहीर गजानन जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. तसेच मराठा सेवा संघाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा. डॉ. रामेश्वर मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अभिवक्ते शिवश्री सतीश जाधव, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

 

हदगाव येथे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय कार्यकारी सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड व नियुक्तीपत्र देऊन गजानन जाधव यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. या वेळी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवश्री शे.रा. पाटील, विभागीय अध्यक्ष शिवश्री व्ही. टी. शिंदे, नांदेड जिल्हा सहसचिव शिवश्री राम डाखोरे, मराठा सेवा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अजय चव्हाण, शिवपार्वती कौटुंबिक भोजनगृहाचे संचालक  त्रिभुवनदेव चव्हाण ईत्यादी उपस्थित होते.

गजानन जाधव हे मागील १५-१६ वर्षापासून हदगांव तालुक्यात ग्रामीण भागातील अनेक गाव खेड्यातील, शाळा-महाविद्यालयात जाऊन प्रबोधनाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या विवेकी विचाराची रुजवण व सर्व कक्षाचे कार्य वाढवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. महाराष्ट्रात शाहिरी कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्य केले आहे व अविरतपणे करत आहेत. स्वच्छ चारित्र्य व निर्व्यसनी, मनमिळावू स्वभाव असल्यामुळे सदरील पदाची जबाबदारी शाहिर गजानन जाधव वाटेगांवकर यांना देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. सतीश कुमार जाधव यांनी सांगितले. प्रा. डॉ. रामेश्वर मोरे व गजानन जाधव तालुक्यासह जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button