Uncategorized

केंद्रस्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात वटफळी केंद्र येथे संपन्न

 

नेर  / रामेश्वर पिंपरे

नेर तालुक्यातील वटफळी केंद्र येथे, केंद्रस्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात वटफळी केंद्र येथे, संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  नितीन जाधव शिक्षण विस्तार अधिकारी नेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक,  मालाताई जांभुळकर सरपंच वटफळी- वटफळा यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ.स्वातीताई अमोलजी मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वटफळी रिहुल दशरथजी घोडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वटफळी तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक  सुवेत शिरसाट (केंद्रप्रमुख वटफळी केंद्र मुख्याध्यापक तथा समस्त शिक्षक वृंद केंद्र वटफळी येथील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मनही आनंदी बनते, खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शारीरिक व मानसिक विकासाचे माध्यम आहे. खेळातून आत्मविश्वास सहकार्य शिस्त नेतृत्व हे गुण रुजतात प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाची आवड जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन माननीय  नितीन जाधव शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नेर यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.

या स्पर्धांमध्ये खो खो, लंगडी, कबड्डी,धावणे, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक, बुद्धिबळ, योगासने, कॅरम, कब बुलबुल मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुवेत शिरसाट सर केंद्रप्रमुख वटफळी यांनी केले. सूत्रसंचालन वंदना गडलिंग मॅडम यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार  सतीश तायडे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button