ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश, आकरा विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

हिमायतनगर / विष्णु जाधव
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून हिमायतनगर तालुक्यातील ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसच्या ११ विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या कोचिंग क्लासेसचे हर्षदा दळवे, अनन्या बिट्टेवार, शौर्य शेळके, इषिता खंडागळे, अनुज हाके, वेदांत बास्टेवाड, समर्थ निरटवाड, आदर्श आंबेपवाड, राजकुमार डुकरे, संजीवनी जाधव, ओमकार शिंगनवाड नवोदय विद्यालयासाठी पात्र झाले आहेत. या यशामागे ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे शिक्षक शिवाजी माने, श्रीकृष्ण माने , संदीप पेंडलवाड , रविकिरण कल्याणकर , आस्मिता वानखेडे मॅडम, सुर्यवंशी मॅडम, श्रीनिवास होळकर व शिवश्री हाॅस्टेलचे संचालक राम राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे संचालक शिवाजी माने पुढे बोलताना म्हणाले की, नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असून आपल्या आई-वडिलांचे नाव उंच शिखरावर नेतील यात दुमत नसून देशाच्या विकासात मोलाचे कार्य यांच्याकडून घडेल.



