वाटेगावच्या सुपुत्राचा गौरव : विद्यानंद जाधव पाटील यांना ‘समाज रत्न पुरस्कार’

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
हदगाव तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या आणि शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या विद्यानंद जाधव पाटील यांच्या कार्याची दखल घेत ए.के. फाउंडेशनच्या वतीने त्यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा ‘समाज रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने आणि सातत्याने कार्य करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे अभ्यासक, प्रभावी वक्ते तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ख्याती मोठी आहे.
या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि परिसरातून त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



