Uncategorized

सरसम येथे सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळातर्फे सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर यांची जयंती साजरी 

 

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

तालुक्यातील मौजे सरसम बु. येथे सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ यांच्या तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव सुपुत्र, चैत्यभूमिचे शिल्पकार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात जीवन समर्पित करणारे सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर म्हणजेच भैयासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पुषहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे आयोजन सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा दलित पँथर चे हिमायतनगर तालुका अध्यक्ष विजय नारायण वाठोरे,अनिल कांबळे व बालाजी कांबळे यांनी केले होते.यावेळी बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील वंदना घेत अभिवादन करण्यात आले.यावेळी विजय वाठोरे यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.या कार्यक्रमास रमाई स्वयंसहायता महिला बचत समुहाच्या अध्यक्ष कालिंदा नारायण वाठोरे,सरस्वताबाई कांबळे,प्रभावती कांबळे,आम्रपाली नगराळे,रुपाली कांबळे,संघप्रिया कवडे,तन्वी नगराळे,भीमराव कांबळे, अनिल कांबळे, बालाजी कांबळे, अमन नगराळे, दक्ष कवडे, साकेत कांबळे,यश कांबळे, संघर्ष वाठोरे यांच्यासह आदिजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button