अशोकराव कासराळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

हिमायतनगर / विष्णु जाधव
चेअरमन, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था, नांदेड तथा जिल्हा सचिव, गोल्ला-गोलेवार यादव महासंघ, नांदेड मा. अशोकराव कासराळीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर शहरातील नामांकित ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थ्यांना वही, पेनचे वाटप करून सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन गोल्ला-गोलेवार यादव महासंघ, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवक अभिषेक बकेवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले, या वेळी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, पेन व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास गोल्ला-गोलेवार यादव महासंघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड सिरंजनीकर, शहराध्यक्ष श्याम जक्कलवाड, सहकोषाध्यक्ष संजय बलपेलवाड, तसेच ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवाजीराव माने सर यांच्यासह क्लासेसमधील संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षिका उपस्थित होते.



