Uncategorized
भोकर व भोशी येथील आदीवासी आश्रम शाळेची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा अन्यथा उपोष्ण – वानोळे

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
पोस्ट बेसिक आदीवासी आश्रम शाळा भोशी व कै. कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, भोकर, जि. नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पंधरा दिवसानंतर आमरण उपोषण करण्यात येईल असे सोनबा वानोळी यांनी आदीवासी प्रकल्प अधिकारी तथा जिल्हाधिकारी एकात्मिक आदीवासी विकास विभाग किनवट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



