Uncategorized

नांदेड येथे भोई समाज महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

नांदेड / दाऊ गाडगेवाड

     भोई समाज महासंघाच्या वतीने दिनांक ४ मे २०२६, सोमवार रोजी सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हा परिषद नांदेडच्या बाजूस असलेल्या सन्मान पेस्टीज एआर ग्रुप येथे भोई समाज महासंघाच्या कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीत दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असून, बेरोजगारांना नोकरीच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील यावरही सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच समाजातील अन्यायग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, समाजाला एकत्रित आणण्यासाठी उपाययोजना करणे आणि व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन होणार आहे.

               याशिवाय, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनेची ध्येय-धोरणे निश्चित करणे, सामाजिक चळवळीला गती देणे तसेच समाजातील विविध प्रश्न, अडचणी व मच्छीमार बांधवांच्या समस्यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भोई समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजूआण्णा मामुलवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button