Uncategorized
वार्ड क्रमांक सातमधील जनतेचा विश्वास – युवा नेतृत्व विशाल हानवते

विष्णु जाधव / हिमायतनगर
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची चाहूल लागल्याने स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि नांदेड जिल्हा युवा सहसचिव विशाल हानवते हे वार्ड क्रमांक सात मधून भावी नगरसेवकपदाचे प्रमुख दावेदार म्हणून उदयास आले असून, त्यांच्या नावावर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय रंगू लागला आहे. समाजकार्य, प्रामाणिक नेतृत्व आणि विकासासाठी असलेला त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक संघटनात त्यांचा प्रभाव वाढत असून, बदल आणि विकासाचा चेहरा म्हणून विशाल हानवते यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे.



