प्राथमिक शाळा खडकी बाजार च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ मनीषा राजकुमार टेकाळे तर उपाध्यक्षपदी सौ ज्योती हर्षवर्धन हनवते यांची निवड*

- हिमायतनगर / विष्णु जाधव
आज दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १०. ३० वाजता खडकी बाजार च्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची एक मीटिंग होऊन त्यामध्ये सर्वांनुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनीषा राजकुमार टेकाळे तर उपाध्यक्ष म्हणून सौ. ज्योती हर्षवर्धन हनवते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून या ठिकाणी शिक्षणप्रेमी म्हणून श्री विनोद गिमेकर तर सदस्य पदी नविद खान पठाण, सचिन डांगे, भीमराव मनमंदे, शिवाजी जांभळे, संजय हनवते, शेख मुर्तूजा, माया वाघमारे,यांची निवड करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रायेवार सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये केंद्रप्रमुख राऊत सर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार औलवाड उपस्थित होते यांच्याबरोबर गावातील बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते सदरील निवडीचे पालक वर्गातून कौतुक होत असून गावकऱ्यांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे



