Uncategorized

कामारी पंचायत समीती गणातून काँग्रेस कडून मा. सरपंच पांडुरंग गाडगे सभापती पदासाठी प्रबळ दावेदार,

विष्णु जाधव/- हिमायतनगर

 

हिमायतनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली असुन लवकरच जिल्हा परिषद, पं‌चायत समीतीच्या निवडणुका लागणार आहेत. त्या आनुशंगाने जिल्हा परिषदेबरोबर पंचायत समीती लढवू इच्छिणाऱ्यांची  धावपळ बघायला मिळत आहे.

 

हिमायतनगर तालुक्यातील खडकी बा. येथील मा. सरपंच पांडुरंग गाडगे यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत ते उच्च शिक्षित असून  ते काँग्रेसचे अनेक वर्षांपासून सच्चे व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मा. आमदार माधवराव पाटील जवळगाकर यांचे निष्ठावंत खंदे समर्थक, चाहते आहेत. पांडुरंग गाडगे यांना कोणताही राजकीय वारसा नसुन सुद्धा ते या गावचे पहिले तंटामुक्तीचे सतत तीन वर्ष अध्यक्ष व ५ वर्ष सरपंच होते.

 

ह्या आगोदरच्या काळात त्यांनी मागासवर्गीय काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्षपद भूषविले. खडकी बाजार हे गाव तालुक्यामध्ये लोकसंखेच्या मानाने खूपच मोठे असुन या गावाला आता पर्यंत कोणतेच पद मिळाले नाही.  येथील जनता काँग्रेस प्रेमी असुन सुद्धा या गावचा आज पर्यंत सत्तेसाठी किंवा तिकिटासाठी काँग्रेसकडून हिरमोडच झाला आहे.  असे अनेक जानकाऱ्यांचे मत आहे. काही काळ पांडुरंग गाडगे यांनी हिमायतनगर तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद सुध्दा भूषवलेले आहे. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर अपार निष्ठा असलेले  मा. सरपंच पांडुरंग गाडगे यांना सर्वच मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी त्यांच्या चाहत्या वर्गाला भेटी गाठी देण्यास सुरुवात केली आहे.

 

त्यांच्या माध्यमातून शासन दरबारीं आवाज उठ‌विण्याचे काम ते करत असून, जनतेच्या आपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी गाडगे सारखा चेहरा हवा अशी रास्त  अपेक्षा  जनसामान्यातून  उमटत आसल्याचे दिसून येत आहे.

 

त्यांनी प्रासार माध्यमांशी संवाद साधतांना सांगीतले की लोक प्रतिनिधी हा जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटनारा  कार्यकर्ता आसावा. त्याच बरोबर त्यांनी शासनाच्या योजना कशा राबविल्या जातात आणी त्या योजना सामान्य जनते पर्यंत पोहचवून सामान्यातील सामान्य माणसाला त्या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल असा प्रयत्न लोकप्रतिनीधीने केला पाहीजे.

 

त्याच बरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडवण्याचे कुशल नेतृत्व त्याच्या अंगी असन्या बरोबरच तो  सुशिक्षित असणे गरजेचे आहे. दळणवणासाठी चांगले रस्ते  पिण्यासाठी शुध्द पाणी, विज, आशा अनेक समस्या सोडवण्यासाठी किंवा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कामारी पंचायत समीती गणाने एक सच्या दिलदार प्रेमळ सर्वांच्या मनातील साधा सरळ कार्यकर्ता निवडला तर आपणास हवा असणारा विकास साधता येईल. आणी आसाच साधा, सरळ, सोपा  बस म्हणलं तिथे बसनारा व आपल्या हक्काचा आपण ज्याच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो असा कार्यकर्ता पांडुरंग गाडगे हॆ जनतेच्या मनातील कार्यकर्ता असल्याने काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यास त्यांचा विजय हॆ काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे मानल्या जात आहे

म्हणुनच  हिमायतनगर तालुका पंचायत समीतीचे सभापती पदाचे आरक्षण हे अनुसुचित जाती महीलेल्या राखीव आरक्षित  असल्या कारणाने मा. सरपंच पांडुरंग गाडगे यांच्या अर्धांगिनी  खडकी बाजार येथील विद्यमान ग्रा.प. सदस्या सौ. माया पांडुरंग गाडगे ह्या सभापती पदाच्या प्रबळ दावेदार आसल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button