Uncategorized

हदगाव तहसील कार्यालयातील शहीद स्मारकाची दुरवस्था; स्वातंत्र्यदिनीच हुतात्म्यांच्या स्मृतीची विटंबना

हदगाव तहसील कार्यालयातील शहीद स्मारकाची दुरवस्था; स्वातंत्र्यदिनीच हुतात्म्यांच्या स्मृतीची विटंबना

 

हदगाव / तुषार कांबळे

 

देशभरात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून प्रशासनाचा बेफिकिरीचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ज्या शूरवीरांच्या आणि क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आज देश स्वातंत्र्याची फळे चाखत आहे, त्याच हुतात्म्यांच्या स्मृती स्मारकाची तहसील कार्यालय परिसरात कमालीची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व शासकीय कार्यालये व शाळांच्या प्रांगणात शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी हुतात्मा स्मारके उभारण्यात आली होती. मात्र, हदगाव तहसील कार्यालयातील हे शहीद स्मारक सध्या कचरा व घाणीच्या विळख्यात सापडले आहे.

एकिकडे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करून देशप्रेमाच्या व हुतात्म्यांना मानवंदना देण्याच्या घोषणा दिल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष हुतात्म्यांच्या स्मारकाला कचऱ्यात ठेवून त्याची विटंबना केली जात असल्याचा घोर प्रकार घडला आहे .  “ही कसली देशभक्ती” असा सवाल नागरिकांनी व्यक्त करत या प्रकाराची जिम्मेदारी तहसीलदार घेणार का ?असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button