Uncategorized

निवघा येथे सार्वजनिक खुली व्यायाम शाळा मंजूर

 

नांदेड प्रतिनिधी /-

मुदखेड तालुक्यातील निवघा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिफारसीने व्यायाम शाळा विकास अनुदान योजने अंतर्गत जिल्हा क्रिडा विभागामार्फत खुली व्यायाम शाळा उभारणीस मंजूरी देण्यात आली असून यामुळे निवघा व परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.

 

निवघा येथे शिक्षणासाठी खांबाळा,सरेगाव, धनज आदि गावचे विद्यार्थी येत असून शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मुला-मुलींना पोलीस भरती, शारीरिक तयारीसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रा. संदिप पवार निवघेकर यांनी खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना निवेदन देऊन वेळोवेळी जिल्हा क्रिडा कार्यालयाकडे पाठपुरावा करून गावहितासाठी ही खुली व्यायाम शाळा मंजूर करून आणल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत असून भविष्यात मुदखेड तालुक्यातील गावागावात खुली व्यायाम शाळा उभारणीसाठी सहकार्य करू त्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा. संदिप पवार निवघेकर यांनी केले.

 

गावात खुली व्यायाम शाळा मंजूर केल्याबद्दल खासदार अशोकराव चव्हाण साहेब व प्रा. संदिप पवार यांचे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण,भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, कैलास दाड, बाळासाहेब देशमुख बारडकर, दत्तू देशमुख, लक्ष्मण जाधव जवळेकर, निलेश देशमुख, उद्धवराव पवार, उत्तमराव लोमटे, कैलास आवातीरक, म्हैसाजी भांगे, निवघ्याच्या सरपंच गोदावरीबाई थोरात, माजी सरपंच मनिषा एडके,पुंडलिक पवार, सुभाषराव पवार, अशोकराव पवार, देविदास कांचनगिरे, लखन कारले, हनुमंत पवार, नारायण नरडेले, बालाप्रसाद पवार, शंकर बापुराव पवार, कामाजी पवार, संभाजी टेकाळे, कल्याण पवार,शेख निझाम,गंगाधर राजेवार,मारोतराव गंगातीरे, मारोतराव पवार, ओमप्रकाश पवार यासह ग्रामस्थांनी कौतुक करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button