कै.श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसमच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
विजय धोबे यांचे केंद्रप्रमुख पदी तर रोहित बिच्चेवार यांची नांदेड पोलीस मध्ये निवड

हिमायतनगर / विष्णु जाधव
हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली सरसम बु. येथील कै. श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत निवड होण्याची यशस्वी झेप घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष शामराव देशमुख व मुख्याध्यापक गजानन देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयातर्फे नेहमीच विविध पदावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून शाळेतील सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतात.यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.यावेळी गावातील दोन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

या विद्यालयात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी तथा जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी चे सहशिक्षक विजय धोबे यांची केंद्रप्रमुख पदी निवड तसेच वडिलांचे छत्र हरवलेल्या अत्यंत खडतर परिस्थितीतही कोणत्याही क्लासेस विना शिक्षण घेऊन रोहित संदीपराव बिच्चेवार यांनी नांदेड पोलीस मध्ये पहिल्याच भरतीत यश संपादक केल्याबद्दल या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १ एप्रिल रोजी विद्यालयात संपन्न झाला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी व शिक्षकवृंद यांनी पुष्पगुछ देत दोघांचेही अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, सहशिक्षक जे. बी. जाधव, आर. डी. चव्हाण, बी. एन. सुरमवाड,जी. एस. भावडे,पी. व्ही. जाधव, पी. जी. राऊतराव, डी. सी. कांबळे,आर. एम. ढेमकेवाड, एस. बी. कदम, अविनाश पवार, एम. जे. वानखेडे, संद्या मोतेवार, शारदा चव्हाण तसेच इलीयास पठाण यांच्यासह आदिजण उपस्थित होते.



