Uncategorized

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संतोष मोकासवाड यांची जिल्हा परिषद शिक्षक पदावर झेप 

संघर्ष, जिद्द,चिकाटी आणि अढळ ध्येय्याच्या जोरावर सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक पदी निवड 

 

 

हिमायतनगर / विजय वाठोरे

परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, अडचणी कितीही मोठ्या असोत; मनात अढळ ध्येय, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे  सरसम येथील संतोष बळीराम मोकासवाड यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षाची वाट तुडवत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षकपदी निवड मिळवली आहे.

यशाच्या या टप्प्यामागे एका दिवसाची मेहनत नसून अनेक दिवसांचा संघर्ष, अडचणींशी दोन हात करण्याची मानसिकता आणि ध्येयापासून न ढळण्याची जिद्द दडलेली आहे. परिस्थितीने अनेकदा परीक्षा घेतली; मात्र संतोष मोकासवाड यांनी परिस्थितीसमोर हार न मानता ‘ध्येय गाठायचेच’ हा निर्धार कायम ठेवला.प्रतिकूलतेला संधी मानून त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यशाची सुंदर किनार लाभली.

हलाखीतून उभं राहून, संघर्षातून घडून आणि मेहनतीतून यश मिळवून ‘जिल्हा परिषद शिक्षक’ होण्याचा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शिक्षक म्हणून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.“परिस्थिती आडवी आली म्हणून स्वप्नं थांबत नाहीत; जिद्द असेल तर संघर्षाच्या वाटेवरूनही यशाचा राजमार्ग तयार करता येतो,” याची प्रेरणादायी प्रचिती संतोष मोकासवाड यांच्या यशातून येते.

त्यांची जिल्हा परिषद शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल चक्रवर्ती सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ सरसम (बु.) यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार विजय नारायण वाठोरे, राजू हिरामण नगराळे, बालाजी दगडू कांबळे, अमन राजू नगराळे, विजेंद्र कांबळे, रतन वाठोरे, अमोल मोकासवाड, माधव मोकासवाड, रामेश्वर यदलवाड, शोभाबाई बळीराम मोकासवाड,पुण्यरथा संतोष मोकासवाड यांच्या सह आदिजण उपस्थित होते.यावेळी संतोष मोकासवाड यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button