पळसपुर येथे कुत्र्यांचा हौदोस, चौघांना घेतला चावा
ज्येष्ठ नागरीकांसह बालकांच्या जीवीतास धोका

हिमायतनगर / विष्णु जाधव
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आता मोकाट कुत्र्यांनी गावातील बालकांना लक्ष केले आहे. दि. २१ शनिवार रोजी श्रीराम चांदराव वानखेडे वय ४५ वर्ष यांच्यासह शिवन्या योगेश जाधव वय ५ वर्ष, निरंजन हनुमान गाडगेवाड वय २ वर्ष तर बाबुराव महाराज वय वर्ष ७५ यांंना दि. २२ रविवार रोजी सकाळी ५ वाजता हनुमान मंदीरात पुजा करताना कुत्र्याने चावा घेतला असून त्या कुत्र्यांना खाज सुटली आहे. ते कुत्रे ठिकठिकाणी उभे टाकून अंग खाजवत आहेत. त्यामुळे गावातील अनेक नागरीकांना अंग खाजत असल्याचे लक्षण आढळून येत असून रोगराई पसण्याचा धोका वाढला आहे. या कुत्र्यांपासून ज्येष्ठ नागरीकांसह बालकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी पाळीव कुत्रा आहे त्यांनी त्यांच्या कुत्र्यांचा बदोबस्त करावा अशी गावातील नागरीकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी मोकाट कुत्र्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी सुज्ञ नागरीकांमध्ये होत आहे.



