Uncategorized
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर / विष्णु जाधव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
यावेळी शिक्षकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, सर्जनशील विचारांना चालना मिळावी आणि वाचन-लेखन संस्कृती रुजावी या उद्देशाने लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्वही सांगण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.



