Uncategorized

फोटोग्राफर चंद्रमणी वाठोरे यांचे दुःखद निधन 

 

 

हिमायतनगर –

तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील रहिवाशी असलेले फोटोग्राफर चंद्रमणी चोखाजी वाठोरे यांचे मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटल मध्ये उपचार घेताना दीर्घ आजाराने दि १ जानेवारी रोजी रात्री १२ : ३० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ४९ वर्षाचे होते.त्यांच्या निधनामुळे वाठोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

त्यांचा अंत्यविधी दि २ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता सरसम बु.ता. हिमायतनगर जि.नांदेड येथे आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,दोन भाऊ,एक बहीण असा मोठा परिवार आहे.से.मु. संघपाल वाठोरे, नारायण वाठोरे व सहशिक्षिका बेबीनंदा सोनवणे यांचे ते भाऊ होत. डॉ.संदेश वाठोरे, हायकोर्ट क्लार्क सुमेध वाठोरे, पत्रकार विजय वाठोरे, राजरतन वाठोरे, संघप्रिया कवडे यांचे चुलते होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button