
विष्णु जाधव /- हिमायतनगर
शाळा हे विद्येचे माहेरघर म्हणुन संबोधले जाते. जिथे विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरविले जातात. त्याच ठिकाणी गैरव्यवहाराला चालणा दिली जात असल्याचा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत घडत असल्याचे निदर्शनास आल्याने मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाराम पांडलवाड यांनी हा प्रकार उघडकीस आणल्याने ग्रामसेवकासह सरपंच, उपसरपंच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून तशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर माहीतीनुसार मंगरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत फरशी बसवण्याचे काम करण्यात येत असून त्या कामामध्ये गैर व्यवहार होत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. गावातील बालक आपलं आयुष्य घडविण्यासाठी शाळेत जातात. त्याच ठिकाणी असा गैरव्यवहार करणे कितपत योग्य आहे. कामातील गैरव्यवहार म्हणजे उद्याच्या युवकांचे आयुष्य अंधारात घालण्याचा प्रकार असून विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे असा सवालही तक्रारदारांनी प्रशासनाला विचारला आहे. सदरील कामाची तात्काळ पाहणी करून चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर कठोर कार्यवाही करून सदरील कामाचा दर्जा सुधारून फरशीचे काम चांगले करून विद्यार्थ्यांना भविष्यात अडचन निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. सदरील निवेदनावर गंगाराम पांडलवाड, प्रकाश गुलझरवाड, मारोती पैलवाड, विठ्ठल खंदारे, संतोष शिरगिरे, नारायण सादलवाड, रूद्रा गुलझरवाड यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.



