Uncategorized

सर्व सामान्यांच्या सुख दुःखाची नाळ जोडलेला व्यक्ती म्हणजे : रमेश पंडीत    

 

 

एक कवि, एक सामाजीक कार्यकर्ता, एक पत्रकार आशा वेगवेगळ्या भुमीकेत पाहावयास मिळणारं व्यक्तीमत्व म्हणजे रमेश उत्तमराव पंडीत . यांचा आज जन्म दिवस …….!

त्यांच्या कविता चाळून पाहिल्या असता सर्वसामान्याच्या सुखाच्या आणि दुःखासी एक फुंकार वाटतात . त्यांच्या कवितेतून सामान्यांच्या वेदना, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या जगण्यातील वेळोवेळीच्या भावना व्यक्त होताना दिसतात . तर सामाजीक जीवनात पिचत पडलेल्या सर्व सामान्यांच्या जगण्याला साद घालतानाही दिसतात . आशा वेगवेगळ्या भावार्थाने व्यक्त होणारा कवि मनाचा माणूस म्हणजे रमेश पंडीत . त्याच बरोबर फूले शाहु आंबेडकर विचाराने प्रेरित होऊन वेळोवेळ सामाजीक कार्यात हिरारीने भाग घेऊन स्वतःची वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण करणारा एक सच्चा आंबेडकरवादी ध्येय वेडा कार्यकर्ता म्हणून ही त्यांनी आपली छाप निर्माण केली आहे हे त्यांच्या अंगी असलेला वेगळपणा वेळोवेळी दिसून येते . आलीकडच्या काळात रमेश पंडित यांनी पत्रकारिता क्षेत्रातही एक आगळी वेगळी आपली ओळख निर्माण केली . त्यांच्या पत्रकरितेत सर्व सामान्यांच्या वेदनेचा, अन्यायाच्या विरोधात लढण्याच्या आणि चुकले त्याला वटणीवर आनण्याच्या एक करारा बाणा दिसून येतो . आशा वेगवेगळ्या क्षेत्रात उलेखनिय कार्य करून आपली ओळख निर्माण करून प्रशासनावर एक दबदबा निर्माण करणारं व्यक्तीमत्व म्हणजे रमेश पंडीत . आज त्यांचा जन्म दिवस ……..!त्यांच्या जन्म दिना निमित्त त्यांना खुप खुप मंगलमय शुभेच्छा .

 

शुभेच्छूक

गंगाधर वाघमारे ज्येष्ठ पत्रकार

हिमायतनगर जि. नांदेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button