सेंदुरसाना येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नमंजुषा स्पर्धेचा यशस्वी समारोप संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून सन्मान

हिंगोली /- मारोती पंडित
सेंदुरसाना – यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,शिरड शहापूर यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.स्पर्धेचा निकाल जाहीर करून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून श्री.ढेंबरे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना बौद्ध विचारधारेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल कांबळे अध्यक्ष,यशवंत बहुउद्देशीय संस्था यांनी केले होते.त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून असे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांची बीजे रोवण्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी अनिल कांबळे,ढेंबरे सर,शामसुंदर ठोंबरे,सुनील मोरे,अरविंद मुळे,अभयराज भगत,चंद्रमुनी मुळे,पिंटू श्रीसागर,धोंडजी ढेकळे,संदेश ढेंबरे,धुरपत धडके,अजय दीपक सुर्यातल,देवानंद जगताप, बाबासाहेब ढेंबरे व सर्व परीक्षार्थी व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



