२० सप्टेंबरच्या वर्धापन दिन सोहळ्यास पारंपरिक लोककलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : त्रिरत्नकुमार भवरे

हिमायतनगर / विष्णु जाधव
महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजच्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी हिमायतनगर येथे भव्य वर्धापन दिन, पुरस्कार वितरण सोहळा व गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील पारंपरिक लोककलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिरत्नकुमार भवरे यांनी केले आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून, पारंपरिक लोककलेचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी योगदान देणाऱ्या लोककलावंतांनाही विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पारंपरिक लोककलावंतांसाठी हा सन्मानाचा विशेष क्षण ठरणार आहे.
नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीत माधवराव पाटील जवळगावकर, तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. विकास वानखेडे, प्रभाकर अण्णा मुधोळकर, गजानन सूर्यवंशी, डॉ. मनोज राऊत, डॉ. मारोती वाकोडे, त्रिरत्नकुमार भवरे, गंगाधर वाघमारे, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, अशोक अनगुलवार, अनिल मादसवार, संभाजी वाठोरे व प्रा. एम. पी. गुंडाळे यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपजिल्हाधिकारीपदी निवडीबद्दल तसेच नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच महाराष्ट्र पर्व साहित्यरत्न पुरस्कार, कलारत्न, उत्कृष्ट पत्रकार, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आणि युवा गझल स्पंदन सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
यानंतर गजानन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा रंगणार असून आबेद शेख व बापू दासरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सूत्रसंचालन चंद्रकांत कदम (सन्मित्र) करणार आहेत.सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक तथा आयोजक विजय वाठोरे सरसमकर व त्यांच्या टीमने केले आहे.
पारंपरिक लोककलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास लोककलावंतांनी आपली कला आणि परंपरेचे प्रतिनिधित्व घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी केले आहे.



