Uncategorized

महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजचा ४ था वर्धापन दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भव्य सोहळा

२० सप्टेंबरला हिमायतनगरात वर्धापन दिन, पुरस्कार वितरण सोहळा व गझल मुशायरा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

 

 

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजच्या ४ था वर्धापन दिनानिमित्त तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य वर्धापन दिन, पुरस्कार वितरण सोहळा व गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू असून, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. शेख रफिक शेख महेबूब राहणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटक हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.  बाबुराव कदम कोहळीकर आहेत.प्रमुख उपस्थिती म्हणून हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.माधवराव पाटील जवळगावकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्रीमती सौ. पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे,मा. नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर ,काँग्रेस तालुकाअध्यक्ष गजानन सूर्यवंशी , डॉ.मनोज राऊत,डॉ. मारोती वाकोडे , जेष्ठ पत्रकार त्रिरत्नकुमार भवरे,गंगाधर वाघमारे,परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, अशोक अनगुलवार, अनिल मादसवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजी वाठोरे तसेच हुतात्मा कॉलेज चे प्रा. एम. पी. गुंडाळे यांची उपस्थिती राहणार आहे.

या सोहळ्यात तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची पदोन्नती होऊन उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र पर्व साहित्यरत्न पुरस्काराने विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये नागोराव डोंगरे, सीमा भांदर्गे , सोनबा दवणे, अर्जुन वाघमारे, प्रा. मधुकर वाडोदे ऍड. मुकुंदराव जाधव , डॉ. नरसिंग कदम, विजयकुमार कदम, रुपाली वागरे-वैद्य, कवी मुरहारी कराड, रमेश मुनेश्वर, मिलिंद जाधव, डॉ. रामशेट्टी शेटकार, जीवन डी. वाघमारे आणि दिनेश फडतरे यांचा समावेश आहे.पत्रकार, अभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांना महाराष्ट्र पर्व कलारत्न पुरस्कार,संपादक प्रशांत रतन वाठोरे यांना महाराष्ट्र पर्व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार,मारोती गायकवाड यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानीय करण्यात येणार आहे. याच बरोबर या कार्यक्रमात गझलक्षेत्रातील मान्यवरासाठी नवीन पुरस्कार “युवा गझल स्पंदन सन्मान 2026” णे गझलकार सय्यद चाँद तरोडकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

 

गझल मुशायऱ्याचीही रंगणार मैफल

 

वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मुशायऱ्याचे अध्यक्ष मा. गजानन वाघमारे (ज्येष्ठ गझलकार) असून, विशेष आकर्षण म्हणून मा.आबेद शेख (ख्यातनाम गझलकार, सवणा) यांची उपस्थिती राहणार आहे.प्रमुख उपस्थितीमध्ये मा. बापू दासरी (ज्येष्ठ गझलकार, नांदेड) यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन चंद्रकांत कदम (सन्मित्र) करणार आहेत. मुशायऱ्यात सय्यद चाँद तरोडकर, आत्तम गेंदे , आत्माराम जाधव, यशवंत मस्के,डॉ.अविनाश कासांडे,सतीश देशमुख,रोहिणी पांडे, डॉ.स्वाती भद्रे -आकुसकर, अंजली मुनेश्वर, छाया नागर्थवार,विजय धोबे आणि विजय वाठोरे हे गझलकार सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हा सोहळा साहित्य, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि गझलविश्वातील मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विजय वाठोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button