Uncategorized

दुष्काळजन्य सद्यस्थितीत करावयाचे पीक नियोजन व्यवस्थापन व शेतकरी महिला प्रशिक्षण संपन्न

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

 

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिय अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, हिमायतनगर येथे आज शेतकरी गटांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कृषी विज्ञान केंद्र (KVK) पोखर्णी (नांदेड-१) व तालुका कृषी कार्यालय, हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तेलबिया पिकांचे देशांतर्गत उत्पादन वाढवून भारताला खाद्यतेल क्षेत्रात स्वावलंबी बनवणे हा होता. या प्रशिक्षणात तालुक्यात प्रथमच शेतकरी गटांना एका अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना मुग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, हळद, ऊस या पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन, तसेच सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच KVK मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणे व उपक्रमाची माहिती देखील त्यांनी दिली.

प्रा. संदीप जायभाये यांनी आपत्तीकालीन पीक व्यवस्थापन व करावयाच्या उपाययोजना यावर तर प्रा. माणिकराव कल्याणकर यांनी विविध पिकातील कीड व रोग व्यवस्थापन यावर सविस्तर शेतकऱ्यांच्या भाषेत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी के. एम. सीडाम होते. डॉ. देवीकांत देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कृषी मंडळ अधिकारी निलेश वानखेडे सहाय्यक कृषी अधिकारी महेश लोसरवार, सुदर्शन माने , बालाजी माजळकर , , हनुमंत नंदनवार , गुवाहाटे साहेब, देवाशीस रावते , बेहरे मॅडम आदिल चाचणी , कृषी मित्र कल्याण वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रस्तावना व कृषी विभागाने रकार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी, जवळगाव, मारोती शामराव काळे यांनी केले. त्याचबरोबर कृषी विभागाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली हे विशेषता महिलांसाठी ठिबक तुषार फळबाग शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा माहिती दिली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button