लातुर येथील नवोदय विद्यालयात चिमुकलीच्या हत्ये प्रकरणी हिमायतनगर येथे रास्ता रोको आंदोलन
लातुर येथील नवोदय विद्यालयात चिमुकलीच्या हत्येप्रकरणी हिमायतनगर येथे रास्ता रोको आंदोलन
हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातुर येथे नवोदय विद्यालयात एका विद्यार्थिनीचा संशयादस्पद मृत्यु झाला होता. ही घटना संपुर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली आहे. ही घटना लातुर जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसून, तो घातपात असून विद्यालयातील पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे. अभ्यासाचा ताण की घातपात प्रशासनाने अद्याप स्पष्ट लेखी उत्तर दिलेले नाही. कु. अनुष्काचा घात झाला असल्याचा आरोप आई वडील आणि सामाजिक संघटनानी केला आहे.
नवोदय विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी. त्यांच्यावर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा.

पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा. विद्यार्थीनींची सुरक्षितता व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जावीत. स्वतंत्र एसआयटी चौकशी समिती नेमून सदरील प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात मातंग समाज कायदा हातात घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. या निषेधार्थ नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात येत्या दि.१२ जानेवारी रोज सोमवारी दुपारी ठिक १२ वाजता भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुकाध्यक्ष राजु गायकवाड, लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, अँड ज्ञानेश्वर पंदलवाड, धम्मपाल मुनेश्वर, आंनद जळपते, सदानंद पतंगे, देवानंद गुंडेकर, राम चिंतलवाड, शिध्दोधन हनवते, यादव येणेकर, माधव कांबळे, प्रशांत राहुलवाड, मारोती गाडेकर, निलेश चटणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला तालुक्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे. कारण या चिमुकलीला न्याय मिळवुन देण्यासाठी समाजाच्या विविध सामाजिक संघटना सामील झाल्या आहेत. असे आवाहन धोंडोपंत बनसोडे, राजु गायकवाड यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.



