
फुलसावंगीत ५२ ब्रास अवैध रे*तीसाठा जप्त*
▪️ *महसूल पथकाची धडक कारवाई!*
फुलसावंगी /शैलेश वानखेडे
येथील बहुचर्चित पैनगंगा नदी वरील दिघडी उच्च पातळी बंधाऱ्या जवळुन होणाऱ्या रेती उत्खननावर चाप बसविण्या साठी आज गुरुवारी महसूल विभागाने धडक कारवाई करत ५२ ब्रास (अंदाजित) अवैध रेतीसाठा जप्त केला आहे. गुरुवारी दि. १३ सकाळी ११:२५ वाजता ही कारवाई करण्यात आली असून, अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने वचक बसवला आहे. ग्राम महसूल अधिकारी विनोद ढोणे यांनी तहसीलदारांना सादर केलेल्या अहवालानुसार, फुलसावंगी येथील हिंगणी पांदण रस्ता तसेच शेत सर्वेक्षण क्रमांक १५८ व १५७ च्या पूर्व उत्तर भागातील नाल्याच्या काठावर हा मोठा साठा आढळून आला. यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी अनुक्रमे २२ ब्रास आणि ३० ब्रास, असा एकूण अंदाजे ५२ ब्रास रेतीचा साठा होता.
अवैध रेती उत्खनन झाल्याचे स्पष्ट होताच महसूल पथकाने तात्काळ सदर साठ्याचा पंचनामा केला आहे. त्याचबरोबर, या उत्खननासाठी वापरला जाणारा रस्ता महसूल विभागाकडून तात्काळ मोठ्या मोठ्या नाल्या मारुन बंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईत ग्राम महसूल अधिकारी विनोद ढोणे यांच्यासह प्रभारी पोलिस पाटील राजेश जंगले, तसेच महसूल सेवक केशव मोहिते, विगय पोटे, व नितीन देवसरकर हे होते. पंचनामा आणि पुढील अहवाल तहसिलदार, महागाव यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.
______*********——-
▪️ *त्या जे सी बी वर कारवाई होईल का?*
सोमवारी रात्र भर जे सी बी ने दिघडी उच्च पातळी बंधाऱ्याच्या गेट जवळुन अवैध रेतीचे उत्खनन करुन १० ट्राॅक्टर ने वाहतुक करून एका रात्रीतुन शेकडो ब्रास रेतीची चोरी केली. त्या जे सी बी वर महसुल विभाग काही कारवाई करेल का? असा प्रश्न नागरिकातुन चर्चीला जात आहे.



