वार्ड क्रं.१७ मधुन सुभाष दारवंडेच्या नावाची चर्चा

विष्णु जाधव / हिमायतनगर
नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजल्याने इच्छुक उमेदवारांनी पक्ष श्रेष्ठींकडे नगरपंचायतीसाठी आपल्या भागातून दावेदारी मजबुत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं. १७ मधून बहुजन चळवळीतून उदयास आलेलं नेतृत्व सुभाष दारवंडे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे यांनी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदासाठी वार्ड क्रं.१७ मधून अधिकृत उमेदवारी मागीतली आहे.
सुभाष दारवंडे बहुजन चळवळीतून पुढे आलेलं व्यक्तीमत्व आहे. त्यांनी आजवर सर्व सामान्य नागरीकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन, उपोषण केले आहेत. त्या आंदोलनामधून नागरीकांना न्याय मिळवून देण्याच काम केलं आहे. त्याच बरोबर त्यांचा प्रेमळ स्वभाव, आपुलकीने सुख, दु:खाची विचारपुस करणारा साधा माणूस म्हणुन त्यांची ओळख त्यांना इतरांपेक्षा वेगळ बनवते. त्या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क असून जनसामान्यांचा जनसेवक म्हणुन वार्ड क्रं.१७ मधील फुलेनगर, बाराळीतांडा, सिद्धर्थनगर, रेल्वे कॉलनी, छत्रपतीनगर येथील जनतेकडून चांगला प्रतिसात मिळत आहे. सुभाष दारवंडेच्या रूपाने जर वार्ड क्र. १७ मध्ये उमेदवार मिळाला तर शांत, संयमी, जन सामान्यांच्या समस्या सोडवणारा, वार्डातील प्रश्न नगरपंचायतमध्ये मांडणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा शिकलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास येथील विकासाला गती मिळणार असा सुर जनतेतून ऐकायला मिळत आहे.



