सौ. निर्मलाताई बन्सीलाल शर्मा वाघीकर यांना महाराष्ट्र भूषण आदर्श माता पुरस्कार जाहीर

नांदेड /राजेश पंडित
वाघी ता. जि. नांदेड येथील सौ निर्मलाताई बन्सीलाल शर्मा वाघीकर यांना डी एस पी न्यूज लाइव्ह चैनल च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र भूषण सोहळा २०२५ ,आदर्श माता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सौ. निर्मलाताई शर्मा या वाघी ता. जि. नांदेड येथील रहिवासी असून त्या नांदेड उत्तर मतदार संघ ( शिंदे गट ) शिवसेनेच्या महिला आघाडी लिंबगाव सर्कल प्रमुख व महिला बचत गटाच्या अध्यक्षाच्या माध्यमातून गावातील व पंचक्रोशीत सामाजिक, धार्मिक सहकार्याच्या भावनेने कार्यात मोठे योगदान दिले आहे. सतत सेवाभाव ठेवून आपले कार्य करीत असतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन डीएसपी न्यूज लाइव चैनल च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामाकिंत व्यक्तीला दिले जाणारे पुरस्कार त्यापैकी एक आदर्श माता पुरस्कार सौ निर्मलाताई शर्मा यांना जाहीर झाला आहे. दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोज रविवारी सकाळी ११:०० वाजता मौजे वडूज ता. खटाव, जिल्हा सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले (खासदार सातारा लोकसभा महाराष्ट्र),जयकुमार मोरे (भाऊ)(पालकमंत्री सोलापूर जिल्हा),दत्तात्रेय (मामा) भरणे (पालकमंत्री वाशिम जिल्हा) आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे
सौ निर्मलाताई शर्मा यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वाघी गावातील गावकरी व लिंबगाव सर्कलच्या जनतेच्या वतीने अभिनंदन व पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.



