
गझलकार आत्तम गेंदे यांना संवेदना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर
नांदेड -दाऊ गाडगेवाड
परभणी येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांना संवेदना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने का. उत्तमराव पंडित यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ दिला जाणारा ‘ संवेदना साहित्यरत्न पुरस्कार 2025 ‘ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या ” बापाची कविता ” या कवितासंग्रहासाठी देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि ५ नोव्हेंबर २०२५ रोजी हिमायतनगर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
गझलकार आत्तम गेंदे हे एक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून कविता, गझल लिहिणे त्यांचा छंद आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक गझल महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. अनेक गझल संमेलन, साहित्यसंमेलनात त्यांनी सहभाग घेत गझल सादरीकरण केलेले आहे. त्यांना यापूर्वीही साहित्यक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांनी लिहिलेला ‘ बापाची कविता ‘ हा दीर्घ काव्यसंग्रह आशयघन असून या साहित्यकृतीबद्दल त्यांना हा संवेदना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्थरावरून कौतुक केले जात आहे तसेच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.



