छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी आमरण उपोषण

हिमायतनगर / विष्णु जाधव
हिमायतनगर शहरात कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी दोन वेळा हिमायतनगर नगरपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात आले. दोन्ही वेळेला लेखी आश्वासन देऊन नगरपंचायत प्रशासनाने उपोषण तात्पुरते स्थगित करायला लावले, परंतु आजपर्यंत हिमाचननगर नगरपंचायत प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने व खोटे आश्वासन देऊन फसवणूक केल्यामुळे माधव किशन शिंदे हे येत्या ३१ मार्च २०२६ रोजी मंगळवारपासून हिमायतनगर नगरपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे. जोपर्यंत महाराजांच्या पुतळ्याकरिता नगरपंचायत जागा देत नाही, तोपर्यंत ते आमरण उपोषण स्थगित करणार नसल्याचे तहसिलदा यांना दिलेल्या निवेदनात लेखी स्वरूपात प्रशासनाला इशारा दिला आहे. आता नगरपंचायत प्रशासनान उपोषण कर्त्याना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणार की, माधव शिंदे यांना पुन्हा आमरण उपोषण करावे लागणार याकडे शहरासह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



