प्रदीप पाटील वानखेडे उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानीत
हिमायत नगर / दाऊ गाडगेवाड
नांदेड जिल्हा कृषी विभाग व आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलाला उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी पुरस्कार हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप किसनराव पाटील वानखेडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
औद्यागीकरण आणि स्पर्धेच्या युगात महागाईने होरपळून निघत असलेल्या काळात शेतीमधून नविन तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून बी, बीयाने, खते औषधींची योग्य निवड करून तसेच जोडधंद्याचा समतोल साधून तोट्यात जात असलेल्या शेतीमधून चांगले उत्पन्न घेऊन शेतीमधून भरघोस उत्पन्न वाढविता येते याचे उत्तम उदाहरण प्रदीप पाटील वानखेडे यांनी मागील काही वर्षात दाखवून दिले आहे. त्यांनी शेतीमध्ये अथक परिश्रम घेऊन शेती ही नोकरीपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. त्याची दखल प्रशासनाने घेऊन उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी म्हणुन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. निश्चितच प्रदीप पाटील वानखेडे यांना मिळालेला हा सन्मान परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.



