Uncategorized

शाहीर रामराव वानखेडे पळसपुरकर ” लोकशाहिर अण्णा भाऊ साठे सन्मान ” पुरस्काराने सन्मानित 

 

 

विष्णु जाधव / हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील सुप्रसिद्ध शाहीर रामराव वानखेडे पळसपुरकर यांच्या शाहिरी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ” लोकशाहिर अण्णा भाऊ साठे सन्मान ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा अखिल भारतीय गुरु रविदास समता पतिषदे तर्फे बिरसा मुंडा साहित्य नगरी,शिव पार्वती मंगल कार्यालय,नांदेड येथे पार पडला.

पळसपूर सारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा आपल्या अंगी असलेल्या कलेच्या जोरावर हिमायतनगर तालुकाच नव्हे तर नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या खणखणीत शाहिरी बाण्याने एक वेगळी ओळख निर्माण केलेले शाहीर रामराव वानखेडे यांच्या लोककलेतील भरीव योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान त्यांच्या कलेला मिळालेला वाव आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे पळसपूर ग्रामस्थांसह तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button