पोटा-कामारी जिल्हा परिषद गटासाठी सौ. सुशिला प्रकाश वानखेडे यांनी मागितली उमेदवारी
डॉ. प्रकाश वानखेडे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकरांचे खंद्दे समर्थक म्हणुन तालुक्यात ओळख

विष्णु जाधव हिमायतनगर प्रतिनिधी /-

नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले असून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू म्हणुन ओळखले जाणारे व तालुक्यात आपली वेगळी प्रतिमा तयार करणारे पळसपुर येथील ग्रामपंचायतीचं तब्बल २० वर्षे नेतृत्व केलेले डॉ. प्रकाश वानखेडे यांच्या अर्धांगिनी सौ. सुशिला प्रकाश वानखेडे यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोटा -कामारी जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आरिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पोटा बु. कामारी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना डॉ प्रकाश वानखेडे, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, जिल्हा कमिटीचे सुभाष राठोड, शहराध्यक्ष संजय माने, माजी संचालक शेख रफीकभाई व आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला आहे. तसेच कॉग्रेस पक्ष श्रेष्ठींनी संधी दिल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पळसपुर येथील ग्रामस्थांसह तालुक्यातील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



