सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पंडित संवेदना समाजरत्न पुरस्कार जाहीर

हिमायतनगर प्रतिनिधी : नुकतेच संवेदना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना संस्थेचे पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पंडित यांना स्मृतीशेष उत्तमराव पंडित यांच्या स्मरणार्थ यंदाचा संवेदना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य २०२४ हा पुरस्कार जाहीर झाला.

पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून त्यांच्या पुरस्काराची घोषणा केली. सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पंडित यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे. आंबेडकर चळवळीतील एक मार्गदर्शक तथा उद्योग क्षेत्रातील देखील महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार पंडित यांनी राबवलेल्या विविध योजना या आदर्श ठरल्या आहेत. त्यांच्या या सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना संवेदना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा स्मृतीशेष उत्तमराव पंडित यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता
लोकप्रतिनिधींच्या हस्ते दिला जाणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल
सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




