Uncategorized

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नवोदय व सैनिकी अकॅडमीचे तीन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

नांदेड / गंगाधर वाघमारे

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून हदगाव तालुक्यातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नवोदय व सैनिक अकॅडमीने पहिल्याच वर्षात घवघवीत यश संपादन केले आहे. या अकॅडमीतील सार्थक सिद्धोधन कवडे, प्रणव गौतम थोरात, महिमा संतोष श्रावणे हे विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र झाले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी निकाल लागलेल्या सैनिक स्कुल पात्रता परीक्षेत पहिल्याच वर्षी सार्थक कवडे, प्रणव थोरात, महिमा श्रावणे, आदर्श वाठोरे, प्रांजली धावंडकर, स्वराली नरवाडे, वैभवी ढोले, अजय मुकाडे, संघर्ष नरवाडे, भावेश सोनाळे, आयुष घुगरे हे ११ पैकी ११ विद्यार्थी पास झाले आहेत. या यशामागे अकॅडमीतील शिक्षक अर्जुन नरवाडे, अजय चव्हाण, निलेश जाधव, गजानन जाधव, आरती भाकरे-माने व संचालक शंकर माने यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button