Uncategorized

 डॉ. ओंकार देवसरकर यांना ‘एमबीबीएस’ पदवी प्रदान

 

हिमायतनगर / विष्णु जाधव

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. एस. पि. एम मेडिकल कॉलेजचा पहिला ऐतिहासिक पदवी प्रदान समारंभ नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यात हिमायतनगर जि. नांदेड येथील रहिवासी विकास पाटील देवसरकर यांचे चिरंजीव.  डॉ. ओंकार ममता विकास पाटील देवसरकर यांना मान्यवरांच्या हस्ते एमबीबीएस ही पदवी प्रदान करण्यात आली.

या दिमाखदार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून एमयूएचएस  नाशिकचे माजी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री व संस्थापक विश्वस्त मा. नां. नारायण राणे , संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. नीलम राणे मॅडम, आमदार मा. डॉ. निलेश राणे, राज्याचे मंत्री मा. ना. नितेश राणे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाबुराव पाटील कोहलीकर यांच्याकडून अभिनंदन

डॉ. ओंकार यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार  बाबुराव कदम कोहलीकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. “ग्रामीण भागातील युवकाने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, डॉ. ओंकार हे भविष्यात रुग्णसेवेचा एक आदर्श निर्माण करतील,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

परिवारात आनंदाचे वातावरण

या विशेष प्रसंगी डॉ. ओंकार यांच्या भगिनी डॉ. भक्ती देवसरकर या देखील उपस्थित होत्या. एकाच कुटुंबात दोन डॉक्टर झाल्यामुळे देवसरकर परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिमायतनगरसारख्या ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाचे शिखर गाठणाऱ्या डॉ. ओंकार यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button