Uncategorized

हिमायतनगर पंचायत समीती सभापती पदासाठी प्राजक्ता गुंडेकर प्रबळ दावेदार

कामारी गणातून लढण्यासाठी खा. आष्टीकरांकडे केली उमेदवारीची मागणी

 

 

दाऊ गाडगेवाड / हिमायतनगर

 

सरसम येथील माजी उपसरपंच तथा शिवदुत खा. नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू राम गुंडेकर यांच्या कन्या सरसम येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता राम गुंडेकर ह्या हिमायतनगर पंचायत समीतीच्या सभापती पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे कामारी गणातून लढण्यासाठी त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात आहे.

प्राजक्ता गुंडेकर ह्या शिवसेना युवतीसेना ( ठाकरे) प्रमुख म्हणुन आज त्या पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत. त्यांचे वडिल शिवदुत राम गुंडेकर हे सुद्धा खा. आष्टीकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन आज त्यांना ओळखले जाते. शिवसेना फुटीनंतर त्यांनी खा. आष्टीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कन्या सुद्धा खा. आष्टीकरांसोबत राहणे पसंत केले. प्राजक्ता गुंडेकर यांनी युवती सेनेचे जिल्हा प्रमुख पद सांभाळत असताना शिवसेना वाढीसाठी कठोर परिश्रम घेतले असून त्याचीच पावती म्हणुन त्या कामारी गणातून पंचायत समीतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांना सभापती होण्याचा मान मिळू शकतो.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button